Sunday, February 22, 2015

Reply on Nikhil Vagale's Twit on Pansare assassination



या ट्विट वर कुणीतरी फेसबुक वर खालील प्रश्न विचारले:


श्रीयुत निखिल वागळे,


आपण मुर्खा सारखा केलेला ट्विट वाचला. अर्थात तुमच्या सारख्या पत्रकारांची दखल घेणे म्हणजे मुर्ख पणाचे ठरेल पण, तुम्ही केलेला ट्विट फार फाल्तू आणि चिड आणणारा आहे. मुख्य म्हणजे त्यात संघाच्या द्वितीय सरसंघचालाकांचा उल्लेख आहे म्हणून हा पत्र प्रपंच.

खर तर तो ट्विट किती जणांनी बघितला माहीत नाही, पण तुमच्या गटार बुद्धि बद्दल सर्वांना माहिती देणे मी माझे नैतिक कर्तव्य समजतो.

आपण म्हणाला की "ज्या सरकार मधे गोळवलकर गुरुजींचे अनुयायी आहेत त्यांच्या कडून नथूराम गोडसे यांच्या अनुयायांच्या अटकेची अपेक्षा करू नये" अर्थात हे वाक्य स्वर्गीय पानसरे यांच्या हत्ये बाबत होते.

मला आपल्याशी वाद घालायचा नाही, पण खलील प्रश्नांची उत्तरे द्या, बस झाल....
  1. हत्या करणारा एखादा दलित अथवा अंबेडकर समर्थक निघाला तर काय ही हत्या अंबेडकर वाद्यान्नी केली असे म्हणणार का? किंवा असे म्हणायची हिंमत दाखवणार का?
  2. हत्या करणारा समजा चुकुन माकुन मराठा निघाला तर मराठा समाजाला दोष देणार का?
  3. हत्या करणारा एखादा पत्रकार निघाला तर पत्रकार जमातिने खून केला असे म्हणायची हिंमत तुमच्यात आहे का?
  4. हत्या करणारा पानसरे यांच्याच घरातला निघाला (या आधीही वैयक्तिक वादातुन असे खून झाले आहेत) तर दोष पानसरे यांच्या संस्करान्ना देणार का? आणखी सर्वात महत्वाचा प्रश्न,
  5. आपण आपली गटार मनोवृत्ति कधी सोडणार?

बाकी, उद्या तुमच्या पार्श्वभागात गळू झाला तर त्याचे खापरही तुम्ही संघस्वयंसेवकांवर फोडाल, काही सांगता येत नाही, त्यामुळे तुमच्या नादाला न लागलेले बरे. परन्तु तुमची वैचारिक गटारी लवकर बंद व्हावी ही स्वर्गीय पानसरें चरणी प्रार्थना.


- अज्ञात


या प्रसंगी मला सुचलेल्या काही ओळी